पतीचा बहिणीसोबतचा फोटो दाखवून पत्नीचा दुसऱ्या लग्नाचा कांगावा, कोर्टाला फसवून घटस्फोट
ग्वाल्हेरमध्ये एका महिलेने पतीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केली. तिने पतीचे दुसरे लग्न झाल्याचा दावा करत पतीचा त्याच्या सख्ख्या बहिणीसोबतचा फोटो सादर केला. न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला, परंतु नंतर पतीला खरे प्रकरण समजले. पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.