मॉडेल मुस्कानची हत्या करणाऱ्या जिम ट्रेनर इम्रानला पोलिसांनी केली अटक
पश्चिम दिल्लीतील टिळक नगर भागात २१ वर्षीय मुस्कानच्या हत्येने परिसर हादरला आहे. आरोपी इम्रानला (वय २३) पोलिसांनी अटक केली आहे. इम्रानने मुस्कानच्या घरी जाऊन तिच्यावर चाकूने वार केले आणि तिची हत्या केली. पोलिसांनी त्याला राजौरी गार्डन येथे पकडले. इम्रान पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या पायांवर गोळ्या झाडून त्याला अटक केली. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.