मालकाची प्रेतयात्रा निघताच पाळीव श्वानानेही सोडले प्राण; कुठे घडली घटना?
मध्य प्रदेशातील बैतूल येथे प्रदीप जैन यांच्या निधनानंतर त्यांच्या पाळीव श्वान डुग्गूनेही प्राण सोडले. प्रदीप जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भोपाळच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवाजवळ डुग्गू अस्वस्थ झाला आणि जेवणही केले नाही. प्रदीप जैन यांच्या प्रेतयात्रेत सहभागी झाल्यानंतर डुग्गू कोसळला आणि त्याचा श्वास थांबला. डुग्गूला प्रदीप जैन यांच्या शेजारीच पुरण्यात आले.