मेघालय उच्च न्यायालयाने सोनम रघुवंशीचा जामीन ठेवला कायम, काय म्हटलं आहे कोर्टाने?
राजा रघुवंशीच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला २९ एप्रिल २०२६ ला जामीन मिळाला होता. शिलाँग न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला मेघालय राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, परंतु उच्च न्यायालयाने जामीन कायम ठेवला. सोनमने तिच्या पतीची हत्या मे २०२५ मध्ये घडवून आणली होती. राज्य सरकारने केलेला युक्तिवाद फेटाळून लावण्यात आला. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.