“इंडिया आघाडीच्या मोर्चात महिलांशी गैरवर्तन करण्यात आलं”; संजय राऊत यांचा आरोप
दिल्लीत आणखी एका आंदोलनाची तयारी राहुल गांधी तयारी करत आहेत असं संजय राऊत म्हणाले तसंच संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. शेतकऱ्यांना मदत न करता जाहिरातबाजीवर खर्च केल्याचा आरोप केला. इंडिया आघाडीच्या मोर्चात महिलांशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्ञानेश कुमार आणि राजीव कुमार भाजपाचे एजंट असल्याचे सांगितले. मोदी आणि शाह यांनी निवडणूक आयोग हायजॅक केल्याचा आरोपही त्यांनी केला.