“इराणशी शस्त्रसंधी करताना अमेरिकेने शेवटपर्यंत अंधारात ठेवलं”; इस्रायलची तीव्र नाराजी
इराणने दिलेल्या दहा कलमी कार्यक्रमानंतर अमेरिकेने इराणशी युद्धादरम्यान दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर केली. इस्रायलने अमेरिकेने अंधारात ठेवून शस्त्रसंधी जाहीर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. इराण-अमेरिका चर्चेत इस्रायलला बाजूला ठेवण्यात आले. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी शस्त्रसंधीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे संघर्ष पुन्हा पेटणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.