युरोपियन संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विवस्त्र पुतळा बसवला; नेमकं प्रकरण काय?
युरोपियन संसदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विवस्त्र सोनेरी पुतळ्याची चर्चा आहे. डॅनिश कलाकार जेन्स गाल्शियॉट यांनी हा पुतळा तयार केला असून, ट्रम्प यांना पर्यावरण आणि जागतिक व्यवस्थेला धोका निर्माण केल्याबद्दल उपरोध म्हणून हा पुतळा बसवला आहे. पुतळा एका सामान्य माणसाच्या खांद्यावर बसलेला आहे, ज्यामुळे तो माणूस पिचला आहे. या पुतळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.