कुणाल कामरा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; म्हणाला, “महाभारत हा इतिहास नाही…”
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गौरव कपूरच्या "Lie Hard" शोमध्ये महाभारताबाबत मत व्यक्त करताना कामराने महाभारताला पौराणिक कथा म्हटल्याने ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. त्याने इतिहास आणि पौराणिक कथा वेगळ्या असल्याचे सांगितले. यावरून वाद निर्माण झाला. कामराने पोस्ट लिहून आपले मत ठाम असल्याचे सांगितले.