पिक-अप व्हॅन उलटली, १२ मजूरांचा मृत्यू, २० जखमी; मध्य प्रदेशात भीषण अपघात!
मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे आणि २० जण जखमी झाले आहेत. बग्गड मार्गावरच्या चिकलिया परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप व्हॅन उलटली आणि एसयूव्हीवर आदळली. मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.