“नातेवाईकांच्या जमीन खरेदीसाठी मुख्यमंत्री जबाबदार कसे?” अधिकाऱ्यांचा १६८ एकर जमिनीवर तर्क
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नातेवाईकांनी १६८ एकर जमीन खरेदी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, यादव यांनी शपथ घेतल्यापासून तीन वर्षांत ४५ कोटींच्या १३७ भूखंडांची खरेदी झाली आहे. सरकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत असून, त्यांच्या नातेवाईकांचा मालमत्ता व्यवसाय असल्याचा दावा केला आहे. यादव यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या व्यवसायाचे समर्थन केले आहे.