“वाद होऊ शकतो” म्हणत हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध ‘डान्सिंग गर्ल’ फोटोला NCERT चा विरोध!
NCERT ने ९वीच्या पुस्तकात हडप्पा संस्कृतीतील 'डान्सिंग गर्ल' मूर्तीला कपडे घालून छापल्याने वाद निर्माण झाला आहे. मूळ नग्न मूर्तीवर आक्षेप घेतल्याने हा बदल करण्यात आला. टीकाकारांनी याला सेन्सॉरशिप आणि ऐतिहासिक मूर्तीचे चुकीचे सादरीकरण म्हटले आहे. मूर्तीचा फोटो आतल्या पानात छापण्यात आला असून, मूळ तांब्याची मूर्ती दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये आहे.