व्हिडीओ पोस्ट करत नेहा बोराचा सवाल; “दिल्ली पोलिसांच्या बस आहेत की छळ छावण्या?”
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतल्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आंदोलकांची धरपकड करण्यात आली असून, अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आलं आहे. नेहा बोराने दिल्ली पोलिसांच्या बसला तुरुंगासारखी असल्याची टीका करत व्हिडीओ पोस्ट केला आहे. बसमध्ये श्वास घ्यायला जागा नसल्याचं आणि आंदोलकांना जातीवाचक शिव्या दिल्याचं तिने सांगितलं आहे.