नेपाळचे मंत्री शिशिर खनाल यांचं भारत-चीनबाबत उत्तर; “आई-वडिलांमध्ये निवड कशी करणार?”
नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी भारत आणि चीनबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. त्यांनी नेपाळचे दोन्ही देशांशी असलेले राजकीय संबंध मजबूत असल्याचे सांगितले. नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे ३९२ जणांचा मृत्यू झाला असून १५०० लोक बेपत्ता आहेत. तिबेट-नेपाळ सीमेवर आलेल्या पुरामुळे २८८ भारतीय बेपत्ता असून २०० तिबेटमध्ये अडकले आहेत. केंद्र सरकार दोन्ही देशांच्या संपर्कात आहे.