“राहुल बाबा २०१४ ते २०२४ SIR कुठे होतं? तरीही तुमचा पराभव का झाला? अमित शाह काय म्हणाले?
SIR विरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली. हरियाणातील सभेत त्यांनी राहुल गांधींना पराभव मान्य नसल्याने ते अपयशाचे खापर निवडणूक आयोग आणि SIRवर फोडत असल्याचा आरोप केला. २०१४, २०१९ आणि २०२४मध्ये SIR नसतानाही काँग्रेस हरल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच तुम्ही म्हणत असाल तर विशेष अधिवेशन बोलवू आणि SIR वर चर्चा करू असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.