Video: बहिणीच्या निधनाचा पुरावा मागणाऱ्या बँकेसमोर भावानं तिचा पुरलेला मृतदेहच आणून ठेवला…
ओडिशाच्या केओन्झार जिल्ह्यातील आदिवासी जितू मुंडा यांनी बहिणीच्या खात्यातील २० हजार रुपये मिळवण्यासाठी तिचा सांगाडा बँकेसमोर आणला. बँकेने वारंवार मृत्यूचा दाखला मागितल्याने वैतागून जितूने हा टोकाचा उपाय केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून जितूला पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. स्थानिक प्रशासनानेही जितूला सहकार्य करण्याचे आदेश दिले.