पहलगाम हल्ल्यात हाफीज सईदचा हात, NIA नं पुरवणी आरोपपत्रात केला उल्लेख!
गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हाफीज सईदचा हात असल्याचं NIA च्या पुरवणी आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. हाफीज सईद आणि त्याच्या लष्कर-ए-तय्यबा व द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. १५९७ पानी मूळ आरोपपत्रात पाकिस्तानची भूमिका, हाफीज सईदचा कथित हात, आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने गोळा केलेले पुरावे यांचा समावेश आहे.