अभिजित दीपकेंची पोस्ट; “आमच्या शांततापूर्ण आंदोलनात गुंड पाठवण्याचा कट आखला गेलाय”
कॉक्रोच जनता पार्टीने नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जंतर मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असून, सोनम वांगचुक यांचा पाठिंबा आहे. दीपके यांनी आंदोलन उधळण्याचा कट आखला जात असल्याचा आरोप केला आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सुरु झालेली ही चळवळ आता राजकीय आणि सामाजिक आंदोलनात परिवर्तित झाली आहे.