विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा We Will Do it चा नारा!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल देशवासियांना संबोधित केले. 'वुई विल डू इट' हा नवा नारा देत त्यांनी विकसित भारताचा संकल्प केला. त्यांनी आपल्या जीवनातील विविध घटनांमधून मिळालेल्या शिकवणींचा उल्लेख केला. मोदींनी २०४७ पर्यंत नवा भारत घडवण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी आत्मनिर्भर भारत, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब, आणि ऑलिम्पिक्सचं आयोजन यांसारख्या उद्दिष्टांसाठी 'वुई विल डू इट' हा मंत्र दिला.