“मोदी जादूगार”, राहुल गांधींनी उल्लेख करताच लोकसभेत खडाजंगी; राजनाथ सिंहांची माफीची मागणी!
संसदेच्या विशेष अधिवेशनात महिलांना ३३% आरक्षण देणाऱ्या विधेयकावर चर्चा झाली. राहुल गांधींनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जादूगाराची उपमा दिली, ज्यावर सत्ताधारी बाकांवरून तीव्र नापसंती व्यक्त झाली. राहुल गांधींनी भाजपावर हल्लाबोल करताना, हे विधेयक महिलांच्या आडून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला.