“नरेंद्र मोदींची तुलना पंडित नेहरुंशी होत नाही हेच त्यांचं मोठं अपयश”; कुणी केलं वक्तव्य?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीवर साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी भाष्य केले आहे. त्यांनी मोदींची तुलना इंदिरा गांधींशी केली, कारण दोघांमध्ये एकाधिकारशाहीची वृत्ती एकसारखी आहे असं शिरसाठ म्हणाले. मोदींनी काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न दाखवलं, पण काँग्रेसचा विचार संपवण्यात अपयशी ठरले. इंदिरा गांधींच्या काळात पक्ष दुर्बल होते, तर मोदींनी विरोधकांना दुर्बल केलं. दोन्ही नेत्यांनी पक्षावर आणि देशाच्या यंत्रणांवर पकड मिळवली असंही शिरसाठ यांनी म्हटलंं आहे.