“तुझ्या बायकोला विक, काहीही कर, पण माझे पैसे परत कर”; हत्याकांडातील आरोपींचे चॅट्स समोर
गुरूग्राम येथील एडानी रिअॅलिटीचे प्रोजेक्ट मॅनेजर युवराज सिंह मनचंदा यांच्या हत्येच्या तपासात नवी माहिती समोर येत आहे. आरोपी अन्या वत्स आणि संयम सचदेव यांची पोलीस चौकशी करत आहेत. व्हॉट्स अॅप चॅट्समधून १ कोटी २ लाख रूपयांच्या वसुलीसाठी मेसेज समोर आले आहेत. आरोपींनी फसवणूक करून पैशांची अफरातफर केली आहे. युवराजची हत्या केल्यानंतर आरोपी उत्तराखंडला पळाले होते. पोलिसांनी आरोपींचे फोन फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत.