CJP च्या आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी होणार नाहीत, पोस्ट करत दिली माहिती
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आणि SIR प्रक्रियेतील घोळाच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. अभिजीत दिपकेंनी 'चलो जंतर-मंतर'चा नारा दिला आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक या आंदोलनात सहभागी होणार नाहीत. त्यांनी लडाखमध्ये नैसर्गिक संकटांवर काम करण्याचं कारण दिलं आहे. वांगचुक यांनी आंदोलनकर्त्यांना एकजूट आणि शांततेचं आवाहन केलं आहे.