उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
जून २०२२ मध्ये ४० आमदारांसह बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं. आता २०२६ च्या जूनमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक खासदार दिल्लीला पोहचले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फुटलेल्या खासदारांची भेट घेऊन लोकसभा अध्यक्षांना पाठिंब्याचे पत्र देणार आहेत. अरविंद सावंत यांनी बंडखोर गटाला मान्यता न देण्याची मागणी केली आहे.