मित्राशी बोलली म्हणून १४ वर्षीय मुलीवर वडिलांकडून वारंवार बलात्कार; कुठे घडली घटना?
गुजरातमधील कच्छ येथे १४ वर्षीय मुलीने तिच्या वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याची आणि आईने विवस्त्र फोटो काढल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. मुलीने सांगितले की, तिच्या मित्राशी फोनवर बोलल्यामुळे वडिलांनी तिला मारहाण केली आणि बलात्कार केला. २० ते २९ सप्टेंबर दरम्यान हे घडले. १ ऑक्टोबरला मुलगी मावशीकडे जाऊन पोलिसांना कळवले. पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा नोंदवून आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे.