“NDA चं सरकार आल्याने मागील १२ वर्षांत देशाचं भाग्य बदललं”, नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारची १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी भाष्य केले. मोदींनी सांगितले की, या काळात २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत, ज्यामुळे निओ मिडल क्लासला धीर मिळाला आहे. त्यांनी देशाच्या सेवेला अध्यात्मिक साधना मानले असून, ही साधना सामूहिक सेवेचा यज्ञ असल्याचे म्हटले. २०१४ नंतर स्थिर सरकार आल्याने देशाचे भाग्य बदलल्याचेही त्यांनी नमूद केले.