महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह रिल करणाऱ्या महिलेला अटक, पोलिसांची कारवाई
गुजरातच्या सुरतमध्ये सिमरन नावाच्या महिलेने महात्मा गांधींच्या फोटोबाबत आक्षेपार्ह रिल तयार केल्यामुळे तिला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने ५०० रुपयांच्या नोटीवर गांधींच्या फोटोबाबत आक्षेपार्ह वर्तन केलं होतं. समाजसेवक धर्मेश गामी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. सिमरनने माफी मागितली असून, पोलिसांनी अशा प्रकारचे व्हिडीओ तयार न करण्याचे आवाहन केले आहे.