Zomato वरुन तरूणीने ४५० रुपयांचा पिझ्झा मागवला, मात्र अर्धवट खाल्लेला पिझ्झा आला
एका तरुणीने झोमाटोवरून ४५० रुपयांचा पिझ्झा मागवला, जो अर्धवट खाल्लेला आणि शिळा आल्याने तिने एक्सवर पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाली असून, तिने पिझ्झाचे फोटोही शेअर केले आहेत. झोमाटोने या घटनेची दखल घेतली असून चौकशीचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियावर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, काहींनी तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.