“काकांच्या वयाचे लोक घाणेरड्या नजरेने मला न्याहळत होते” महिलेने पोस्ट केला व्हिडीओ
दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसमध्ये फिरायला गेलेल्या नेहा कोपानी आणि तिच्या मैत्रिणीला काही पुरुषांच्या घाणेरड्या नजरेचा सामना करावा लागला. नेहाने हा प्रसंग कॅमेरात टिपून सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या मैत्रिणीला स्लीव्हलेस कपड्यांवर शर्ट घालून शरीर झाकावं लागलं. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या, काहींनी दिल्लीतील परिस्थितीवर टीका केली तर काहींनी मुंबईचं स्वातंत्र्य अधिक चांगलं असल्याचं म्हटलं.