नरेंद्र मोदींच्या आवाहनावर फडणवीसांनी दिला पाकिस्तानचा दाखला; म्हणाले, “शेजारी देशात…”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशवासीयांना पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतालाही फटका बसत आहे. मोदींनी परकीय चलनाची बचत करण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवावा, सोन्याची खरेदी कमी करावी असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानचे उदाहरण देत मोदींच्या आवाहनाचे समर्थन केले. आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनीही मोदींचे आवाहन योग्य ठरवले.