‘मी त्यावेळी हनुमान चालिसा म्हणत होतो’, कॅप्टन स्मित मच्छार यांनी काय सांगितले?
दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबई विमानातील सह-वैमानिकाचा घातपाताचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचे कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधला. स्मित मच्छार यांनी कॉकपिटमधील थरारक प्रसंग कथन केला आणि हनुमान चालीसा म्हणत असल्याचे सांगितले. मोदींनी त्यांच्या धैर्याचे कौतुक केले.