“जॉर्जिया मेलोनी मला खूप आवडतात”, भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं तोंड भरून कौतुक
अमेरिकेने अनेक देशांवर आयात शुल्क लादल्यामुळे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत व्यापार तणाव, सुरक्षा, संरक्षण, आणि स्थलांतर यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी मेलोनी यांचं कौतुक केलं आणि रोम भेटीचं आमंत्रण स्वीकारलं. मेलोनी यांनी ट्रम्प यांच्या आयात शुल्क निर्णयाचा निषेध केला. मेलोनी उद्या अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी चर्चा करणार आहेत.