“…तर मी त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारीन”, काँग्रेसच्या नेत्याची पवन खेरांवर टीका
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधी आणि पवन खेरा यांच्यावर टीका केली आहे. अय्यर म्हणाले की, ते गांधीवादी आहेत पण राहुलवादी नाहीत. त्यांनी पवन खेराला कठपुतळी म्हणत त्यांच्यावरही टीका केली. पवन खेरांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की, ते त्यांच्या क्षमतेनुसार बोलतात आणि लिहितात, आणि अय्यर यांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही.