शेतमजूर आईची मुलगी ते देशाची IAS अधिकारी; कोचिंगशिवाय दिव्याने २१ व्या वर्षी घडविला इतिहास
हरियाणाच्या दिव्या तंवरने कोणत्याही महागड्या कोचिंगशिवाय, केवळ ऑनलाइन संसाधने आणि मेहनतीच्या जोरावर वयाच्या २१ व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. पहिल्याच प्रयत्नात आयपीएस आणि दुसऱ्या प्रयत्नात आयएएस बनून तिने एक नवा आदर्श निर्माण केला. तिच्या आईने शेतमजुरी करून शिक्षण पूर्ण केले. दिव्याचा संघर्षमय प्रवास आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.