IAS अधिकारी वंदना वैद्य यांच्या फार्महाऊसवर जुगाराचा अड्डा; पोलिसांना पत्र देत म्हणाल्या..
मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यात आयएएस अधिकारी वंदना वैद्य यांच्या फार्महाऊसवर पोलिसांनी धाड टाकली. येथे जुगार खेळणाऱ्या १८ लोकांना अटक करण्यात आली. वंदना वैद्य यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत, काही अज्ञात लोकांनी बेकायदेशीरपणे फार्महाऊसमध्ये प्रवेश करून अवैध काम केल्याचे सांगितले. पोलिसांनी ३० मोबाइल फोन, पत्ते आणि १३.६८ लाख रुपये जप्त केले. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.