IIT आता डॉक्टर घडवणार! वैद्यकीय तज्ज्ञांच्या पलीकडे ‘फिजिशियन-इंजिनिअर्स’ची गरज का भासतेय?
तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा यांच्यातील दरी सांधण्यासाठी आयआयटी कानपूर, खरगपूर आणि मद्रास या देशातील तीन आघाडीच्या अभियांत्रिकी संस्थांनी वैद्यकीय शिक्षणात पाऊल ठेवले आहे. पारंपरिक वैद्यकीय पदव्या देण्यापेक्षा वैद्यकीय ज्ञान आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची उत्तम सांगड घालणारे 'फिजिशियन-इंजिनिअर्स' तयार करणे, हा यामागचा मुख्य हेतू आहे. आजघडीला आरोग्यक्षेत्राला अशा 'हायब्रिड माइंड' असलेल्या तज्ज्ञांची अत्यंत गरज आहे.