‘तिनं सख्ख्या भावाशी लग्न केलं’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांकडून महिला खासदार लक्ष्य
अमेरिकेच्या गृह सुरक्षा खात्याचे मंत्री मार्कवेन मुलिन यांनी डेमोक्रॅटिक खासदार इल्हान ओमर यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी आपल्या सख्ख्या भावाला अमेरिकेत आणण्यासाठी त्याच्याशी कागदोपत्री विवाह केला होता. हा वाद २००९ मधील ओमर यांच्या विवाहाशी संबंधित आहे. ओमर यांनी हे आरोप फेटाळले असून, त्यांना राजकीय हेतूने प्रेरित म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, परंतु कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.