‘एआय इम्पॅक्ट समिट’चा भव्य शुभारंभ; ४५ देशांचे मंत्री आणि जागतिक सीईओ एकत्र
नवी दिल्ली एआय इम्पॅक्ट समिट २०२६: १६ फेब्रुवारीपासून दिल्ली येथे 'एआय इम्पॅक्ट समिट २०२६' सुरू होत आहे. या समिटमुळे भारत जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला उद्घाटन होणार आहे. ४५ हून अधिक देशांचे मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ आणि ४० हून अधिक सीईओ सहभागी होणार आहेत. या परिषदेत एआयचे लोकशाहीकरण आणि विविध क्षेत्रांतील एआय उपायांचे प्रदर्शन होईल.