‘तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या’, ममदानी यांनी लिहिलेल्या पत्रावर भारताची टीका
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी उमर खालिदसाठी हस्तलिखित पत्र लिहिले होते. या पत्रात ममदानी यांनी खालिदला पाठिंबा दर्शवला होता. भारताने या पत्रावर टीका केली असून, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी लोकप्रतिनिधींनी इतर लोकशाही देशांमधील न्यायव्यवस्थेचा आदर करावा, असे म्हटले.