मोदी-ट्रम्प यांच्यातील ‘त्या’ गुप्त कॉलमध्ये इलॉन मस्कही होते? भारताने स्पष्टच सांगितलं!
२४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दूरध्वनी संभाषणात इलॉन मस्क सहभागी होते, असा दावा 'न्यूयॉर्क टाइम्स'ने केला होता. मात्र, भारत सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, हे संभाषण केवळ दोन नेत्यांमध्येच झाले होते. या संभाषणात होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तणाव आणि इंधन पुरवठ्याच्या अडथळ्यांवर चर्चा झाली.