ड्रोनमधून क्षेपणास्त्र कसं डागलं जातं? जाणून घ्या भारताच्या नव्या ‘सायलेंट किलर’ची ताकद!
भारताने मानवरहित युद्धतंत्रात मोठी भरारी घेतली असून DRDO ने विकसित केलेल्या ULPGM-V3 या ड्रोनवरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे. आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे पार पडलेल्या या चाचणीमुळे आता भारताची ड्रोन यंत्रणा केवळ टेहळणीपुरती मर्यादित न राहता शत्रूवर हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत अचूक मारा करण्यास सज्ज झाली आहे.