अमेरिका-जपानला जमले नाही ते कल्पक्कममध्ये भारताने केले; अणुऊर्जेत मोठी भरारी!
रशियानंतर ‘फास्ट ब्रीडर रिऍक्टर’ तंत्रज्ञान यशस्वी करणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरला आहे. कल्पक्कम येथील PFBR ने 'क्रिटिकॅलिटी' साध्य केली असून, यामुळे अमेरिका, जपान आणि फ्रान्ससारख्या देशांना जे जमले नाही ते भारतीय वैज्ञानिकांनी करून दाखवले आहे. थोरियमच्या साठ्याचा वापर करून भविष्यात भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून परकीय अवलंबित्व संपुष्टात येईल.