जगाच्या नव्या ‘इक्वल अर्थ’ नकाशाला भारताचा पाठिंबा!
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जगाचा अधिक वास्तववादी नकाशा तयार करण्याच्या प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिला आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले की जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताच्या अधिकृत नकाशानुसारच दाखवले गेले पाहिजेत. आफ्रिकन युनियनने मांडलेल्या 'इक्वल अर्थ' नकाशाच्या प्रस्तावाला १६४ देशांनी समर्थन दिले, तर अमेरिकेने विरोध केला. मर्केटर नकाशाच्या त्रुटी दूर करण्यासाठी २०१८ मध्ये 'इक्वल अर्थ' नकाशा विकसित करण्यात आला.