भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारत….’
भारताचे अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी 'भारतीय अंतराळ स्थानक' बांधण्यात येणार आहे. हे स्थानक २०३५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२४ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगनयान मोहिमेअंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहे. तसेच, भारताने खोल समुद्र मोहिमेचा भाग म्हणून समुद्रतळावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे.