भारताकडे लढाऊ विमानांचा भीषण तुटवडा; पाकिस्तान-चीनची ताकद वाढतेय, हवाईदल प्रमुखांना चिंता?
भारतीय हवाई दलाकडे सध्या लढाऊ विमानांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी दरवर्षी ३६ ते ४० नवीन लढाऊ विमानांची गरज व्यक्त केली आहे. चीनकडून पाकिस्तानला फिफ्थ जनरेशन J-35 स्टेल्थ विमाने मिळण्याच्या पार्श्वभूमीवर भारताची घसरती स्क्वॉड्रन संख्या चिंतेचा विषय ठरली आहे. तेजस Mk1A चे उत्पादन आणि AMCA प्रकल्पातील विलंब यामुळे भारताच्या सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.