ऑपरेशन सिंदूरचा लोगो कुणी तयार केला होता माहितीये?आर्मी बुकलेटमध्ये दोन अधिकाऱ्यांची नावे!
गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' नाव देण्यात आले. लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग यांनी या मोहिमेचा लोगो तयार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मोहिमेचा उल्लेख करत पाकिस्तानला थेट इशारा दिला.