लंडनमध्ये ३६ व्या मजल्यावरून पडून मुंबईतील मराठी कुटुंबाचा करुण अंत
लंडनमधील अंकल टॉवर ब्लॉकच्या ३६ व्या मजल्यावरून पडून राकेश पै (४७), अदिती परळकर (४६) आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा सिड यांचा मृत्यू झाला आहे. सिड गंभीर आजाराने ग्रस्त होता. आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला तरी कुटुंबाच्या मित्रांनी ही शक्यता फेटाळली आहे. पै आणि परळकर २००० साली मुंबईहून लंडनला आले होते. पोलिस तपास सुरू आहे.