अमेरिकेतील २०००० भारतीयांवर हद्दपारीची टांगती तलवार; ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका बसणार?
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ४२ निर्णयांवर स्वाक्षरी केली. यात कॅनडा व मेक्सिकोवर अतिरिक्त आयात शुल्क, जागतिक आरोग्य संघटनेच्या करारातून अमेरिकेला मुक्त करणे आणि बेकायदेशीर नागरिकांना हद्दपार करणे यांचा समावेश आहे. यामुळे २० हजार ४०७ भारतीयांवर हद्दपारीची टांगती तलवार आहे. अमेरिकेतील आयसीईच्या ताब्यात असलेल्या विदेशी नागरिकांमध्ये भारतीयांचा चौथा क्रमांक आहे.