सर्वपक्षीय शिष्टमंडळात ५१ सदस्य; कोण कोणत्या देशाला देणार माहिती, जाणून घ्या संपूर्ण यादी
पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सात खासदारांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ २३ मेपासून ३२ देशांना भेट देणार आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व बैजयंत पांडा, रविशंकर प्रसाद, संजय कुमार झा, श्रीकांत शिंदे, शशी थरूर, कनिमोझी करुणानिधी आणि सुप्रिया सुळे करतील. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू या मिशनचे समन्वयक असतील.