सोनमनंच केली पतीची हत्या; धक्कादायक खुलासा! गाझिपूरमध्ये विमनस्क अवस्थेत सापडली पत्नी
इंदोरमधील सोनम आणि राजा रघुवंशी हे दाम्पत्य २२ मे रोजी शिलाँगमधून बेपत्ता झाले होते. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. सोनम उत्तर प्रदेशच्या गाझिपूरमध्ये सापडली आणि तिनं पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं. मेघालय पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली असून आणखी एका हल्लेखोराचा शोध सुरू आहे.