समुद्राच्या तळाशी दडलेल्या शत्रूचा वेध! ‘आयएनएस मंगरोल’ नौदलासाठी कशी ठरणार गेमचेंजर?
भारतीय नौदलात 'आयएनएस मंगरोल' (INS Mangrol) ही अद्ययावत पाणबुडीविरोधी युद्धनौका समारंभपूर्वक दाखल झाली आहे. 'माहे' वर्गातील ही तिसरी ASW-SWC युद्धनौका असून कोचीन शिपयार्डने तिची निर्मिती केली आहे. उथळ पाण्यात लपून बसलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा अचूक शोध घेणे, सोनार यंत्रणा व पाणतीरांच्या सहाय्याने वेध घेणे यासाठी ही अत्यंत सक्षम आहे. भारताच्या ११ हजार किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आणि सागरी सुरक्षेला बळ देण्यासाठी आयएनएस मंगरोलची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.